वैवाहिक जीवनात सेक्स ही ड्युटी नाही, सेक्सला नकार देणाऱ्या महिलेला न्यायालयाकडून दिलासा

फ्रान्सच्या न्यायालयाने वैवाहिक जीवनात सेक्सबाबत महत्वाची टिप्पणी केली आहे. नवऱ्यासोबत शारीरीक संबंध ठेवत नसल्याने फ्रान्सच्या एका महिलेला न्यायालयाने घटस्फोटासाठी दोषी ठरवले होते. या निकालाविरोधात महिलेने युरोपातील सर्वोच्च मानवाधिकार न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर आता सुनावणी झाली असून न्यायालयाने महिलेच्या बाजूने निर्णय दिला आहे. वैवाहिक जीवनात सेक्स ही ड्युटी नाही असे टिप्पणी न्यायालयाने सुनावणी दरम्यान केल्याने महिलेला दिलासा मिळाला आहे.

सुश्री एचडब्ल्यू असे फ्रेंच महिलेचे नाव असून तिचा 1955 मध्ये जन्म झाला होता. घटस्फोटानंतर फ्रान्समध्ये तिचे कायदेशीर सर्व मार्ग बंद झाले. अशावेळी 2021 मध्ये युरोपियन मानवाधिकार न्यायालयाकडे धाव घेतली. फ्रेंच न्यायालयांनी महिलेच्या खाजगी आणि कौटुंबिक जीवनाचा आदर करण्याच्या अधिकाराचे उल्लंघन केले आहे असे या निर्णयात म्हटले आहे. या प्रकरणात न्यायालय वैवाहिक जीवनात हस्तक्षेप करण्याचे कोणतेही कारण ओळखू शकले नाही,असे निवेदनात म्हटले आहे.

अहवालानुसार, सुश्री एचडब्ल्यूचे 1984 मध्ये लग्न झाले होते. तिला 4 मुले होती. काही काळानंतर तिने पतीकडे घटस्फोटाची मागणी करण्यास सुरुवात केली.तिने स्वत:ला याबाबत दोष देणे चुकीचे वाटत होते. तिने युक्तिवाद करत हे तिच्या खासगी आयुष्यात हस्तक्षेप आणि शारीरिक इच्छांचे उल्लंघन आहे. महिलेने सांगितले की, 2004 पासून तिचे तिच्या पतीसोबत संबंध ठेवले नाहीत. यासाठी तिने तिच्या आरोग्याच्या समस्या आणि पतीकडून होणारा हिंसाचार ही कारणे सांगितली. युरोपियन मानवाधिकार न्यायालयाने तिच्या या युक्तिवादाचा गांभिर्याने विचार करत तिच्या बाजूने निकाल दिला.