
मध्य रेल्वे मार्गावर मागील वर्षभरात मालवाहतुकीचे प्रमाण वाढले आहे. आर्थिक वर्ष 2024-25मध्ये 74.39 दशलक्ष टन मालवाहतूक झाली. 2023-24 या आर्थिक वर्षाच्या तुलनेत मालवाहतुकीचे प्रमाण 1.2 टक्क्यांनी वाढले आहे. फेब्रुवारीमध्ये पेट्रोलियम उत्पादनांचे 208 रॅक लोड करण्यात आले. फेब्रुवारी 2024 मध्ये 175 रॅक होते. याव्यतिरिक्त खतांचे 114 रॅक आणि सिमेंटचे 244 रॅक लोड करण्यात आले. गेल्या वर्षीच्या तुलनेत मालवाहू गाडय़ांच्या सरासरी वेगातही 2.1 टक्क्यांची वाढ झाली आहे. मध्य रेल्वेकडून सेवा सुधारण्यावर भर दिला जात आहे. मालवाहतुकीत झालेली वाढ हे त्याचेच उदाहरण आहे, असा दावा मध्य रेल्वेने केला आहे.