‘यूपीएससी’च्यावतीने घेतल्या गेलेल्या नागरी सेवा मुख्य परीक्षा 2024 या परीक्षेचे निकाल घोषित झाले आहेत. मुख्य परीक्षा उत्तीर्ण झालेल्या व मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या राज्यातील विद्यार्थ्यांसाठी राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था (एसआयएसी) मुंबई येथे मुलाखत प्रशिक्षण सत्राचे आयोजन करण्यात आल्याची माहिती संचालक डॉ. भावना पाटोळे यांनी दिली. या प्रशिक्षणाचा लाभ घेण्यासाठी राज्यातील विद्यार्थ्यांनी 2 जानेवारी पूर्वी siac@[email protected] या ई-मेलवर अर्ज करावेत. अधिक माहितीसाठी दूरध्वनी क्रमांक 022-22070942 येथे संपर्क साधावा असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.