
ऑनलाईन डेटिंग अॅप्सच्या नावाखाली ठगाने तरुणाची फसवणूक केली. याप्रकरणी पवई पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा नोंद केला आहे. सांताक्रुझ येथे राहणाऱ्या एका तरुणाने अॅप डाऊनलोड केले. त्या अॅपवर प्रोफाइल मॅच झाल्यावर तो मुलीसोबत मोबाईल शेअर करून व्हॉट्सअॅपवर चॅटिंग सुरू केले. तिने व्हिडीओ कॉल केला आणि त्याला नग्न होण्यास सांगितले. त्यानंतर 20 हजार रुपयांची मागणी केली. भीतीपोटी त्याने पैसे दिल्यावर आणखी पैशाची मागणी केली. ही फसवणूक असल्याचे लक्षात आल्यावर त्याने पोलिसांत धाव घेतली.
विमा कर्मचाऱ्याची फसवणूक
ऑनलाइन बक्षिसाच्या नावाखाली ठगाने विमा कर्मचाऱ्यांची 10 लाखांची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी सायबर पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे. फेसबुकवर रील्स पाहत असताना एक पॉप अॅप आले. एक रुपयाच्या नोटेवर क्लिक केल्यावर 4 लाख 54 हजार रुपये मिळतील अशी ती जाहिरात होती. बक्षिसासाठी नोंदणी करण्याच्या नावाखाली फसवणूक करण्यात आली.