आसाम खाण दुर्घटनेतील 4 कामगारांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश; अजूनही बचाव कार्य सुरूच

आसाम खाण दुर्घटनेतील खाणीतून आतापर्यंत 4 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्यासाठी बचाव कार्य सुरू आहे. आसाम खाण बचाव पथकाकडून चार कामगारांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. आसाम खाण बचाव पथकाकडून चार कामगारांचे मृतदेह बाहेर काढले असून पाच अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी बचाव कार्य सुरू आहे.

आसाममधील उमरांगसो येथील कोळसा खाण दुर्घटनेला 6 दिवस पूर्ण झाले. जिल्ह्यात सुरू असलेल्या बचाव कार्यात आतापर्यंत चार कामगारांचे मृतदेह सापडले आहेत. सोमवारी एका कोळसा खाणीत अचानक आलेल्या पुरामुळे ही घटना घडली, ज्यामध्ये एकूण नऊ कामगार अडकले. बुधवारी पहिला मृतदेह सापडला. शनिवारी सकाळी आणखी तीन मृतदेह सापडले. त्यापैकी एकाची ओळख पटली असून इतर दोन मृतदेहांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.

उमरांग्सू येथील कोळसा खाणीत शिरलेले पाणी आम्लयुक्त होते, त्यामुळे दृश्यमानता कमी झाली आहे. बचावपथक प्रतिकूल परिस्थितीत बचाव कार्य करत आहे. आम्लयुक्त पाण्यामुळे रिमोट-कंट्रोल्ड वाहने वापरणे देखील कठीण होत आहे. सध्या ही बंद करण्यात आली होती. त्या दिवशी कामगार पहिल्यांदाच खाणीतून कोळसा काढण्यासाठी गेले होते. त्यावेळी ही दुर्घटना घडली होती.