हिंदुस्थानात 2024 या वर्षात कारच्या विक्रीत विक्रमी वाढ पाहायला मिळाली आहे. अवघ्या एका वर्षात प्रथमच कारच्या विक्रीने 40 लाखांचा टप्पा पार केला आहे. 2024 मध्ये देशात 40.73 लाख कारची विक्री झाली आहे. 2023 च्या तुलनेत ही विक्री 5.18 टक्क्यांहून अधिक आहे. 2023 मध्ये 38.73 लाख कारची विक्री झाली होती.
फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल असोसिएशन (फाडा) ने दिलेल्या माहितीनुसार, टूव्हीलरच्या विक्रीतसुद्धा गतवर्षीच्या तुलनेत 10.78 टक्क्यांची वाढ झाली आहे. म्हणजेच वर्षभरात दुचाकीची 1.89 कोटी वाहने विकली गेली आहेत. 2023 मध्ये दुचाकीची 1.71 कोटी वाहने विकली आहेत. व्यावसायिक वाहनांच्या किरकोळ विक्रीत कोणताही मोठा बदल दिसून आला नाही. मुख्य नेटवर्कचा विस्तार आणि बाजारात नवीन मॉडेल्सच्या प्रवेशामुळे कारची विक्री वाढली आहे.
कोणत्या कारची किती विक्री
कंपनी 2024 2023
मारुती सुझुकी 40.26 टक्के 40.85 टक्के
ह्युंदाई मोटर 13.75 टक्के 14.23 टक्के
टाटा मोटर्स 13.21 टक्के 13.58 टक्के
महिंद्रा 12.03 टक्के 10.44 टक्के
टोयोटा किर्लोस्कर 6.35 टक्के 4.99 टक्के