जम्मू-कश्मीरमध्ये शनिवारी लष्कराच्या वाहनाला झालेल्या अपघातात चार जवान शहीद झाले. यामध्ये राजस्थानमधील अलवर जिह्यातील नितेश यादव यांना वीरमरण आले. नितेश यांच्या मृत्यूची वार्ता समजतात त्यांच्या काकांचा मृत्यू झाला. गावात पार्थिव आणल्यानंतर जवानाला मानवंदना देताना ‘अमर रहे’च्या घोषणा सुरू होत्या. अशातच शहीद जवानाचे काका तिसऱया मजल्यावरून अचानक खाली पडले. मग त्यांना जवळच्या इस्पितळात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.