विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत जगज्जेत्या ठरलेल्या हिंदुस्थानी संघातील चार खेळाडू उद्या विधिमंडळात येणार आहेत. हिंदुस्थानी संघातील मुंबईकर क्रिकेटपटू रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे आणि यशस्वी जयस्वाल हे चार खेळाडू मुंबईचे आहेत. त्यांचे आज मुंबईत आगमन झाल्यानंतर मोठय़ा जल्लोषात त्यांचे स्वागत करण्यात आले. उद्या हे चौघेही विधिमंडळात येणार आहेत. त्यांचा सत्कार विधिमंडळाच्या आवारात केला जाणार आहे. हिंदुस्थानी क्रिकेट संघाच्या विजयाबद्दल विधानसभेत अभिनंदनाचा प्रस्ताव नुकताच मांडला गेला होता. उद्या येणाऱया खेळाडूंचाही सत्कार केला जाईल, असे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सांगितले.