पुण्यात काचेचं सामान उतरवताना भीषण अपघात झाला आहे. या अपघातात चार मजुरांचा मृत्यू झाला आहे. तर एका मजुराची प्रकृती गंभीर आहे. कटराज भागातील येवलेवाडीत दुपारी अडीचच्या सुमारास हा अपघात झाला.
कटराज भागात एक काचेचा कारखाना आहे. या कारखान्यात काचेचं सामान उतरवताना पाच ते सहा मजूर अडकले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले. त्यांनी सर्व मजुरांना बाहेर काढलं आणि जवळच्या रुग्णालयात दाखल केलं. पण या अपघातात चार मजुरांचा मृत्यू झाला तर एका मजुराची प्रकृती गंभीर असून त्याच्यावर उपचार सुरू आहे.
#WATCH | Pune, Maharashtra: Samir Shaikh, Station Officer, Kondhwa, Pune Fire Department says, “We received info that a few people are stuck under the stack of heavy glasses while unloading them from a truck in Yewalewadi area of Pune city…We immediately reached the spot and… pic.twitter.com/Bry1uuTwOJ
— ANI (@ANI) September 29, 2024