चार हिंदुस्थानींच्या हाती अमेरिकेचा कारभार, सत्तेत ‘पॉवर’ वाढला

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतीच जिंकली. 20 जानेवारी 2025 रोजी ट्रम्प राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतील. त्याआधी त्यांनी वेगवेगळय़ा विभागांच्या प्रमुखांची घोषणा केलेय. यामध्ये चार हिंदुस्थानी वंशाचे आहेत. विवेक रामास्वामी, कश्यप काश पटेल, जय भट्टाचार्य आणि उषा वान्स अशी चौघांची नावे आहेत.

  • जय भट्टाचार्य हे डोनाल्ड ट्रम्प सरकारमध्ये आरोग्य खाते सांभाळणार आहेत. त्यांना नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ  हेल्थची जबाबदारी देण्यात आलीय.
  •  ट्रम्प यांनी विवेक रामास्वामी आणि इलॉन मस्क यांना ‘डिपार्टमेंट ऑफ गव्हर्न्मेंट एफिशियन्सी’चे प्रमुख केले आहे.
  • ट्रम्प सरकारमध्ये एफबीआयची जबाबदारी कश्यप काश पटेल यांना देण्यात आलीय.