कामावरून घरी परतत असताना ट्रॅक्टर ट्रॉली उलटल्याने अपघातात चौघांचा मृत्यू झाला तर 12 जण जखमी झाले आहेत. ग्वाल्हेरमधील घाटीगावच्या जाखोडा येथे शनिवारी रात्री हा अपघात घडला. जखमींना जेएएच ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळताच बचाव पथकाने तात्काळ घटनास्थळी दाखल होत जखमींना बाहेर काढले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सहारिया आदिवासी समाजाचे 31 जण शनिवारी दुपारी 4 वाजता पै खो गावात शतावरी जंगलातील औषधांची मुळे खोदण्यासाठी गेले होते. तेथून परतत असताना ट्रॉली अनियंत्रित झाल्याने उलटली.