‘क्वाड’ चीनची झोप उडवणार, समुद्रातील जहाजांची दादागिरी रोखणार

समुद्रातील चिनी जहाजांची दादागिरी रोखण्यासाठी हिंदुस्थान, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया हे चार देश संयुक्तपणे काम करणार आहेत. इंडो पॅसिफिक क्षेत्रांमधील अवैध मासेमारी आणि सागरी सुरक्षा मजबूत करणे हे त्यांचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी क्लाड्रिलेटरल सिक्युरिटी डायलॉग’ म्हणजेच ‘क्वाड’ गठीत करण्यात आलंय. येत्या 21 सप्टेंबर रोजी अमेरिकेत होणाऱ्या ‘क्वाड शिखर संमेलन’त चारही देश याची संयुक्त घोषणा करण्याची शक्यता आहे.

हिंदुस्थान, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया हे चार देश ‘क्वाड ’च्या माध्यमातून एकत्र येऊन सागरी व्यापार आणि त्यासोबत सागरी सुरक्षा मजबूत करण्यावर काम करत आहेत. याअंतर्गत जहाज सुपरवायझर मिशन पुढील वर्षी सुरू होण्याची शक्यता आहे. याअंतर्गत जपानी तटरक्षक, हिंदुस्थान तसेच ऑस्ट्रेलियाचे तटरक्षक हे अमेरिकेच्या तटरक्षक जहाजावर तैनात दिसतील. याशिवाय प्रत्येक देश सागरी गस्त आळीपाळीने करेल.