महाकुंभची बनावट वेबसाइट; भक्तांची लूट, चार जणांना अटक

महाकुंभची बनावट वेबसाइट बनवून हॉटेल बुकिंग करणाऱया चार जणांना अटक करण्यात आली आहे. चारही आरोपी वाराणसी येथील एका सॉफ्टवेअर पंपनीत वेबसाइट बनवण्याचे काम करतात. त्यांच्याकडून तीन लॅपटॉप, दोन मोबाइल आणि सहा एटीएम कार्ड आदी साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे. प्रयागराज शहरातील बड्या, नामांकित हॉटेलचे फोटो लावून आरोपी भक्तांकडून अतिरिक्त पैसे उकळत होते. उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारीदरम्यान महापुंभचे आयोजन केले जाणार आहे. दरम्यान, बनावट वेबसाइटच्या माध्यमातून आरोपी महाकुंभसाठी येणाऱया भक्तांची लूट करत होते. कान्हा श्याम या हॉटेलची बनावट वेबसाइट तयार करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.