
भौतिक जीवन जगत असताना अनेकदा आपल्यावर अनेक संकटे येतात. त्यावेळी नेमके काय करावे, कसे वागावे, हे कळत नाही. अशा परिस्थितीतच भगवान कृष्णाने अर्जुनाला दिलेली शिकवण ही आजही 21व्या शतकात उपयोगी पडते. भौतिक जीवनामध्ये आदर्श जीवनपद्धती कशी जगावी, याचा मार्ग भगवद्गीतेमध्ये सांगितला आहे. भगवद्गीता ही भारतीय तत्त्वज्ञानाचा गाभा आहे, असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी व्यक्त केले.
अभिताभ होनप लिखित ‘मी गीता बोलतीय’ या भगवद्गीतेचे उत्कंठावर्धक वर्णन करणाऱ्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला. यावेळी भारतीय पुस्तक न्यासाचे विश्वस्त राजेश पांडे, गीता धर्म मंडळाच्या कार्यवाह विनया मेहंदळे, लेखक धनंजय गोखले, जनसेवा फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. विनोद शहा, लेखक अभिताभ होनप उपस्थित होते. यावेळी धनंजय गोखले, डॉ. शहा आणि विनया मेहेंदळे यांनी पुस्तकामागील भूमिका मांडली.
स्मिता कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. मुग्धा नलावडे यांनी अभिवाचन केले.