कामगिरी सुमार, बडबड जास्त, कोहलीकडून काही शिक; माजी क्रिकेटपटूने बाबर आझमला सुनावले

पाकिस्तान संघाचा माजी कर्णधार युनिस खान याने स्टार फलंदाज बाबर आझम याच्यावर जोरदार टीका केली आहे. अलीकडेच बांगलादेशविरुद्ध खेळल्या गेलेल्या कसोटी मालिकेत 0-2 असा पराभव पत्करावा लागला. या कसोटी मालिकेत पाकिस्तान संघाची कामगिरी चांगली नव्हती. यावर आता पाकिस्तानचा संघाचा माजी कर्णधार यूनिस खान याने टीमचे खेळाडू आणि बाबर आझम यांच्याबाबत एक वक्तव्य केले आहे. शिवाय बाबरला विराट कोहलीकडून काहीतरी शिकावे असा सल्लाही दिला आहे.

बाबर आझमचा सध्याचा फॉर्म खराब होत आहे . त्याने मागच्या 16 टेस्ट मॅचमध्ये आतापर्यंत अर्धशतकही करु शकलेला नाही. यावर यूनिस याने बाबर आझमवर संताप व्यक्त केला आहे. तो म्हणाला जर बाबर आणि बाकी टॉपचे खेळाडू मैदानावर चांगली कामगिरी केली तर निकाल सर्वांना स्पष्ट होतील.

यूनिस खान याने कराची प्रिमीयर लीगच्या पत्रकार परिषदेदरम्यान बाबर आझमवर टीका केली होती. यूनिस म्हणाला की, बाबरला जेव्हा टीमची कर्णधारपद सोपविण्यात आली होती त्यावेळी तो आमचा सगळ्यात चांगला फलंदाज होता. त्याला कर्णधार बनविण्याच्या निर्णयात मीही सहभागी होतो. मात्र आता परिस्थिती वेगळी आहे,, अशावेळी त्याने स्वत:च याबाबत विचार केला पाहिजे. तो पुढे म्हणाला की, बाबरने फार कमी वयात खूप काही मिळविले आहे, पण आता त्याला भविष्यात काय साध्य करायचे आहे हे समजून घेणे आवश्यक आहे. तुम्हाला देशासाठी पुन्हा खेळण्याची संधी मिळणार नाही हे तुम्ही नेहमी लक्षात ठेवावे.

यूनिस पुढे म्हणाला की, विराट कोहलीला बघा, त्याने स्वतःच कर्णधारपद सोडले आणि आता तुम्ही त्याची फलंदाजी पहा जी पूर्णपणे वेगळ्या पातळीवर पाहायला मिळते आणि तो सतत नवनवीन विक्रम करत आहे. यावरून हे लक्षात येते की खेळाडूचे पहिले प्राधान्य नेहमीच देशासाठी खेळणे याकडे असावे कर्णधारपदाला नाही.