
सध्या हसण्याच्या मूलभूत अधिकाराचीही चोरी झाली आहे. हसण्याच्या अधिकाराला धोका निर्माण झाला आहे, अशा शब्दांत ओडिशा उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती डॉ. एस. मुरलीधर यांनी चिंता व्यक्त केली. राजकीय परिस्थिती, इतर घडामोडींवर मार्मिक टिप्पणी करणाऱ्या हास्य कलाकारांवर सरकार कारवाई करीत असल्यामुळे मुरलीधर यांचे वक्तव्य महत्त्वपूर्ण ठरत आहे.