
नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाचे (एनईपी) शिल्पकार आणि इस्रोचे माजी प्रमुख के. कस्तुरीरंगन यांचे आज बंगळुरू येथील निवासस्थानी वृद्धापकाळाने निधन झाले. ते 84 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात दोन मुलगे आहेत. कस्तुरीरंगन यांचे पार्थिव 27 एप्रिलला अंत्यदर्शनासाठी रमण संशोधन संस्थेत (आरआरआय) ठेवण्यात येणार आहे.