पुण्यात गेल्या महिन्यात झालेल्या हिट अँड रन प्रकरणात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणात अल्पवयीन आरोपीच्या सुटकेसाठी या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तरुण तरुणी मद्यधुंद होते असे सिद्ध करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्या दोघांच्याही विसेरा रिपोर्टमध्ये मद्य आढळून आल्याचे सिद्ध करण्याची तयारी पूर्ण झाली असल्याचा आरोप माजी गृहमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अनिल देशमुख यांनी केला आहे.
अनिल देशमुख यांनी X वरून पोस्ट शेअर करत हा गंभीर आरोप केला आहे. ”पुणे हिट ॲन्ड रन प्रकरणामध्ये राजकीय दबावाखाली आरोपीचे रक्ताचे नमुने बदलून आरोपी दारू न पिल्याचा अहवाल तयार करण्याचे प्रयत्न झाले,हे उघड झाले आहे. आता माजी गृहमंत्री म्हणुन माझी माहिती अशी आहे की, मृतकांच्या विसेरा रिपोर्टमध्ये मद्य यावे याकरिता पूर्णपणे तयारी झाली आहे. जेणेकरुन या प्रकरणामध्ये मृत झालेले मोटरसायकल वरील तरुण तरुणी हे दारु पिऊन होते आणि त्यांच्यामुळेच हा अपघात झाला, असे न्यायालयात सिद्ध करता येईल. जेणेकरून विशाल अग्रवालचा मुलगा लवकर सुटेल, अशा पध्दतीने प्रयत्न सध्या सरु आहेत”, असे ट्विट अनिल देशमुख यांनी केले आहे.
पुण्यातील बिल्डर विशाल अगरवाल यांचा अल्पवयीन मुलाने 20 मे रोजी मध्यरात्री 3च्या सुमारास मित्रांसाबेत हॉटलेमध्ये मद्यपान पार्टी केल्यानंतर अलिशान पोर्शे कारने दुचाकीस्वाराला धडक दिली. त्यामुळे दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या तरूणीचा 10 ते 15 फूट उंच उडून खाली पडल्यामुळे जागीच मृत्यू झाला. तर, कारने फरफटत नेल्यामुळे दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला. याप्रकरणी घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी अल्पवयीन आरोपीला मारहाण करत पोलिसांच्या ताब्यात दिले. या प्रकरणी साक्षीदाराला डांबून ठेवले, आरोपीच्या रक्ताचे नमुने बदलणे या गुन्ह्यात आरोपीचे वडील, आजोबा व आई असे संपूर्ण कुटुंब तुरुंगात आहे. तसेच ससून रुग्णालयातील डॉक्टर, तीन वॉर्डबॉय, दोन पोलिसांना निलंबीत करण्यात आले आहे.
चे पूर्ण कुटुंब हे तुरुंगात आहे.