माजी परराष्ट्र मंत्री एस.एम कृष्णा यांचे निधन, 92 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

देशाचे माजी परराष्ट्र मंत्री, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री व महाराष्ट्राचे माजी राज्यपाल एस.एम कृष्णा यांचे मंगळवारी पहाटेच्या सुमारास निधन झाले. ते 92 वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते, मंगळवारी रात्री राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.