
आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची मुलगी हर्षिता लग्नबंधनात अडकली. शुक्रवारी संभव जैन यांच्यासोबत विवाह पार पडला. या वेळी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया पत्नीसोबत उपस्थित होते. हा लग्नसोहळा निवडक निमंत्रक यांच्या उपस्थितीत पार पडला. येत्या 20 एप्रिलला हर्षिता आणि संभव जैन यांचा रिसेप्शन कार्यक्रम होणार आहे.