Sourav Ganguly – टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीच्या कारला अपघात

टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीच्या कारला पश्चिम बंगालमध्ये अपघात झाला. दुर्गापूर एक्सप्रेसवरील दंतनूरजवळ गुरुवारी हा अपघात झाला. सुदैवाने अपघातात गांगुलीला कोणतीही इजा झाली नाही. कारचे किरकोळ नुकसान झाले आहे. बर्दवान विद्यापीठातील कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी जात असताना ही घटना घडली.

गांगुलीच्या ताफ्यासमोर अचानक ट्रक आल्याने चालकाने अचानक ब्रेक लावला. यामुळे मागच्या वाहनांना धडक बसली. ताफ्यातील मागची वाहनेही एकमेकांवर आदळली. सुदैवाने गांगुली किंवा त्याच्या ताफ्यातील इतर कुणालाही कोणतीही दुखापत झाली नाही. अपघातानंतर 10 मिनिटे एक्सप्रेसवेवर वाहतूक कोंडी झाली. यानंतर वाहतूक पूर्ववत होऊन गांगुलीचा ताफा रवाना झाला.