
दिल्लीतील 1984 च्या शीखविरोधी दंगल प्रकरणात काँग्रेसचे माजी खासदार सज्जन कुमार यांना दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू न्यायालयाने आज जन्मठेपेची शिक्षा सुनावली. 12 फेब्रुवारी रोजी न्यायालयाने या प्रकरणी कुमार यांना दोषी ठरवले होते. 1 नोव्हेंबर 1984 रोजी दिल्लीतील सरस्वती विहार परिसरात एका शीख वडील आणि मुलाच्या हत्येशी संबंधित हे प्रकरण आहे. तक्रारदार आणि सीबीआयने दोषी सज्जन कुमार यांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली होती.