
बांगलादेशचा माजी कर्णधार तमिम इक्बालला सोमवारी सकाळी सामन्यादरम्यान हृदयविकाराचा झटका आला. त्याला तातडीने ढाकापासून दूर असलेल्या एका रुग्णालयात दाखल करण्यात आले. तमिम हा ढाका प्रीमियर डिव्हिजन क्रिकेट लीगमधील सामना खेळत होता. तमिमची प्रकृती थोडी नाजूक असल्याने त्याला सध्या ढाकामध्ये नेणं शक्य नसल्याची माहिती बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे मुख्य चिकित्सक डॉ. देबाशीष चौधरी यांनी दिली.
मोहम्मडन स्पार्टिंग क्लब आणि शाईनपुकुर क्रिकेट क्लब यांच्यात हा सामना खेळला जात आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेल्या इक्बालला सामन्यादरम्यान छातीत अचानक दुखू लागले. सुरुवातीला त्याला एअरलिफ्ट करून ढाका येथे आणण्याची तयारी सुरू होती, मात्र तसं होऊ शकलं नाही. यानंतर त्याला फाजिलातुनेसा रुग्णालयात दाखल करण्यात आले.