अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जिमी कार्टर यांचे निधन

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष व शांततेचा नोबेल पुरस्कार विजेते जिमी कार्टर यांचं वयाच्या 100 व्या वर्षी निधन झाले आहे. कार्टर हे गेल्या काही वर्षांपासून कर्करोगाने ग्रस्त होते. अखेर रविवारी रात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला.जिमी कार्टर हे 1977 ते 1981 पर्यंत ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते. ते अमेरिकेचे 39 वे राष्ट्राध्यक्ष होते.

कार्टर यांचा जन्म 1 ऑक्टोबर 1924 रोजी झाला. कार्टर हे 1971 ते 1975 दरम्यान ते जॉर्जिया प्रांताचे गव्हर्नर होते. 1977 साली त्यांना डेमोक्रॅटिक पक्षाकडून राष्ट्राध्यक्षपदाची उमेदवारी देण्यात आली. त्या निवडणूकीत त्यांनी आर. फोर्ड यांचा पराभव केला होता. 2002 मध्ये त्यांना शांततेचा नोबेल पुरस्कार मिळाला होता