
सध्याच्या घडीला ग्रे हेअर आणि केसगळती या दोन्ही समस्या सर्वांनाच भेडसावत आहेत. पांढऱ्या केसामुळे आपला लूक बदलतो, चेहऱ्यावरील तेजही जाते. त्यामुळे पांढरे केस दिसण्यापेक्षा ते काळे करणे हा उपाय अनेकांनी स्विकारलेला आहे. बाजारातील डायमध्ये रसायनांचा वापर असल्यामुळे, केस लगेच काळे होतात. पण यामुळे आपले केसही खूप गळायला सुरुवात होते. घरी केसांना डाय लावणं हे अनेकांना कटकटीचे वाटते. परंतु नैसर्गिक घटकांचा वापर करुन केसांना काळा रंग अगदी घरच्या घरी सुद्धा देता येऊ शकतो. तेच आपण पाहुया.
असे करा तुमचे केस काळे
तुम्हाला एका भांड्यात मेंदी घ्यावी लागेल. त्यात काळा चहा मिसळून घ्यावा. यानंतर, त्यात थोडे खोबरेल तेल घालावे. हे सर्व पदार्थ लोखंडी तव्यात किंवा कढईमध्ये भिजवावे. लोखंडी तव्यात भिजवल्यामुळे मेंदीचा काळेपणा अधिक वाढतो. किमान ४ तास ही मेंदी भिजू द्यावी. त्यानंतर केसांना लावावी. ही मेंदी सुकल्यानंतर केसांना मस्त रंग चढतो. मेंदी धुतल्यानंतर केस शॅम्पूने धुवावे.हे वापरल्याने तुम्हाला बाजारातील केसांचा रंग वापरण्याची गरज भासणार नाही. यामुळे तुमचे केस काळे होतील.
केस काळे करताना या गोष्टी लक्षात ठेवा
तुमच्या डोक्यावरील त्वचेला समस्या येऊ नये म्हणून मेंदीमध्ये घालण्यात येणाऱ्या घटकांची पॅच टेस्ट करा.
जर तुम्हाला हवे असेल तर केस काळे करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला नक्कीच घ्या.आठवड्यातून फक्त एकदाच केसांना मेंदी लावा. यामुळे तुमचे केस नैसर्गिकरित्या काळे होतील.
अशा प्रकारे तुम्ही तुमचे पांढरे केस काळे करू शकता. हे लावल्याने तुमच्या केसांमध्ये चमक येईल. यासोबतच केसांची वाढ देखील सुरू होईल.
(कोणतेही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)