ड्रग तस्करीचा मार्ग जातो पोटातून

आखाती देश, पूर्व अमेरिकन आणि आफ्रिकन देशातील ड्रग तस्कर हे अमली पदार्थाची तस्करी साठी कॅरिअरचा वापर करण्याचे प्रकार वाढू लागले आहे. नुकतेच सीमा शुल्क विभागाने एका परदेशी नागरिकाला अटक केली. त्याने पोटातून 785 ग्रॅम कोकेन आणले होते. जप्त केलेल्या कोकेनची किंमत सुमारे 7 कोटी 85 लाख रुपये आहे. पोटातून ड्रग आणल्याची ही वर्षभरातील पाचवी घटना आहे.

बुधवारी एक प्रवासी हा छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आला. त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने त्याला ताब्यात घेतले. त्याने पोटातून कोकेन आणल्याचे त्याने तपास यंत्रणाना सांगितले. त्यानंतर त्याला न्यायालयाच्या आदेशानंतर जे. जे. रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी त्याच्या पोटातून कोकेन असलेल्या कॅप्सूल बाहेर काढल्या. जप्त केलेल्या कोकेन ची किंमत सुमारे 7 कोटी 85 लाख रुपये इतकी आहे. त्याला अटक करून न्यायालयात हजर केले होते.  परदेशातील तस्कर हे हिंदुस्थानात चोरटय़ा मार्गाने ड्रग आणू पाहत आहेत. गेल्या काही दिवसापासून तस्कर हे आफ्रिकन खंडातील नागरिकांना पॅरिअर म्हणून वापर करतात. गरिबी आणि पैशाचे प्रलोभन तसेच हिंदुस्थानात फिरण्यासाठी जायचे असे सांगून आफ्रिकन खंडातील नागरिकांना ते निवडतात. खास करून महिलांना ते टार्गेट करतात. ड्रग असलेल्या कॅप्सूल त्याना खायला देतात. 19-24 तास प्रवास केल्यावर ते कॅरिअर हे मुंबईत येतात. मुंबईत आल्यावर ते हॉटेल निवडतात. त्यानंतर पोटातील ड्रग ते तस्करांच्या पंटरना देतात अशी त्याची मोडस असते. पोटातून ड्रग आणताना प्रवाशाचा जीव देखील जाण्याची शक्यता असते. तस्करांनी दिलेला टास्क पूर्ण करायचा असल्याने पॅरिअर हे जीवावर बेतून हे काम करत असतात.

n कॅप्सूल स्वरूपात कोकेन आणणे सोपे असते तरी ते धोकादायक असते. n पोटातून ड्रग आणल्याची ही चौथी घटना आहे. n जानेवारी महिन्यात तीन युगांडाच्या नागरिकाना अटक केली होती. त्या तिघांनी पोटातून 21. 97 कोटीचे कोकेन आणले होते. n 2 मार्चला डीआरआय ने एका महिलेला अटक केली होती. तिच्या पोटातून देखील 11 कोटीचे कोकेन जप्त केले होते. n 5 मार्च ला युगांडा देशाच्या नागरिकाला अटक केली होती. त्याने देखील पोटातून काढले ड्रग काढले होते.