हिंदुस्थानचा शेजारी देश पाकिस्तानची जीडीपी केवळ ‘कट्टरते’मध्येच काम करीत आहे. शांती आणि विकास एकत्र चालतात हे पाकिस्तान समजून घेत नाही. त्यामुळेच पाकिस्तानची ही स्थिती झाली असून पाकिस्तान आपल्या कर्माची फळे भोगत असल्याचा टोला आज विदेशमंत्री डॉ. एस जयशंकर यांनी लगावला.
संयुक्त राष्ट्र महासभेच्या 79 व्या बैठकीत बोलताना एस. जयशंकर यांनी पाकिस्तानच्या आतंकवादाला समर्थन देण्याच्या भूमिकेचा समाचार घेतला. कोणत्याही प्रकारच्या दहशतवादाचा नेहमीच विरोध केला गेला पाहिजे आणि पाकिस्तानचे दहशतवादी मनसुबे उघड केले पाहिजेत. पाकिस्तानची दहशतवादी नीती कधीही यशस्वी होणार नाही, असा टोलाही त्यांनी लगावला. पाकिस्तानने बेकायदेशीररीत्या बळकावलेला भाग खाली केला गेला पाहिजे, असेही ते म्हणाले.