लग्नासाठी ती थेट जर्मनीहून ग्वालियरला आली, हिंदुस्थानी पद्धतीने विवाह सोहळा पडला पार

विदेशी तरुणींना हिंदुस्थानी मुले पसंत पडत आहेत. याआधी अनेक विदेशातील तरुणींनी हिंदुस्थानातील मुलांसोबत लग्नगाठ बांधली आहे. आता जर्मनीतील एका तरुणीने थेट ग्वालियर गाठत आपले लग्न उरकून घेतले आहे. ग्वालियरमधील भिंड येथील मूळचा रहिवासी असलेला इंजिनिअर राहुल बोहरे हा गेल्या ८ वर्षांपासून जर्मनीतील एक मोठ्या कंपनीत कामाला आहे. त्याच कंपनीत एमिली नावाची तरुणा कामाला आहे. दोघांची आधी ओळख आणि ओळखीचे नंतर प्रेमात रुपांतर झाले. दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. या दोघांच्या लग्नाला राहुल आणि एमिली यांच्या दोघांच्या घरांतून विरोधा झाला नाही, उलट हे लग्न हिंदुस्थानात थाटामाटात व्हावे असे ठरले. नव्या वर्षात या दोघांचे लग्न हिंदु रितीरिवाजाप्रमाणे थाटामाटात पार पडले. यावेळी एमिलीचे कुटुंब आणि राहुलचे कुटुंब उपस्थित होते. या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.