एअरपोर्ट अॅथॉरिटी ऑफ इंडिया विमानतळांवर इकॉनॉमी झोन अनिवार्य करण्यात येणार आहे. त्यामुळे विमानतळावर आता खाद्यपदार्थ स्वस्त मिळणार आहेत. या आऊटलेटवर खाद्यपदार्थ सुमारे 60 ते 70 टक्के स्वस्तात मिळतील, असा दावा करण्यात आला असून विमानतळावर एका चहाची किंमत 125 ते 200 रुपये तर इकॉनॉमी झोनमध्ये हाच चहा 50 ते 60 रुपयांना मिळणार आहे. महागडय़ा रेस्टॉरंटप्रमाणे सेवा आणि प्रमाणामध्ये फरक असेल. म्हणजेच बसण्याऐवजी उभे टेबल असेल. चहा लहान कप किंवा ग्सासेसमध्ये दिला जाईल. पूर्ण जेवणाऐवजी कॉम्पॅक्ट जेवण असेल. पॅकिंगच्या मूलभूत गुणवत्तेत खाद्यपदार्थ उपलब्ध असतील. विमानतळावरील खाद्यपदार्थ प्रचंड महाग असून सर्वसामान्य प्रवाशांना ते परवडत नसल्याची तक्रार अनेक दिवसांपासून प्रत्येक राज्याचे प्रवासी आणि लोकप्रतिनिधी करत असल्याचे नागरी उड्डाण मंत्रालयाच्या एका अधिकाऱयाने सांगितले. सामान्य प्रवाशाला घरातून विमानतळावर पोहोचण्यासाठी आणि नंतर प्रवास करून इच्छित स्थळी पोहोचण्यासाठी सरासरी सहा ते सात तास लागतात. विमानतळ आणि विमान या दोन्ही ठिकाणी प्रवाशांना चहा, पाणी किंवा जेवण घेता येते, परंतु किमती इतक्या जास्त आहेत की, लोक काहीही खाण्यापेक्षा उपाशी राहण्यात धन्यता मानतात. या सर्व गोष्टींचा विचार करून विमानतळावर इकॉनॉमी झोन उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे अधिकाऱयाने सांगितले.
या वस्तू मिळणार नाहीत
इकॉनॉमी झोनमध्ये केवळ खाण्यापिण्याची सुविधा उपलब्ध असेल. याच्याशी संबंधित आऊटलेट्सच असतील. कपडे, खेळणी, मोबाईल स्टोअर्स किंवा इतर शॉपिंग आऊटलेट्स नसतील. सर्वसामान्य प्रवाशांना परवडणाऱया दरात जेवणाची सुविधा उपलब्ध करून देणे हा त्याचा उद्देश आहे, असे भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या अधिकाऱयांनी सांगितले.
लहान आणि मध्यम आकाराच्या विमानतळांवर 6 ते 8 दुकाने सामावून घेण्यासाठी पुरेशी जागा असेल तसेच प्रति तास 160 ते 200 प्रवाशांना हाताळण्याची क्षमता असणार आहे.
डिसेंबरपर्यंत देशातील तीन विमानतळांवर ही सुविधा सुरू होण्याची शक्यता आहे. येत्या सहा महिन्यांत प्रत्येक विमानतळावर इकॉनॉमी झोन विकसित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
नागरी विमानात वाहतूक मंत्री राममोहन नायडू यांनी दोन महिन्यांत विविध समस्या सोडवण्यासाठी तीन बैठका घेतल्या. यात एअरपोर्ट अॅथॉरिटी ऑफ इंडिया, विमानतळ ऑपरेटिंग पंपनी आणि विमानतळावर खाण्यापिण्याची दुकाने चालवणाऱया पंपन्यांचा समावेश होता.