भेसळखोरांचे परवाने रद्द करणार, अन्न व औषध प्रशासन कठोर पावले उचलणार

दूधभेसळ रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभाग अधिक सक्रिय झाला असून दूध डेअऱ्यांवर धाडी टाकण्यात येत असून 100 दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत आतापर्यंत 1,83,397 दुधाच्या साठय़ांची तपासणी करण्यात आली आहे. दूधभेसळ रोखण्यासाठी आता भेसळखोरांना केवळ दंड ठोकून सोडून न देता त्यांचे परवाने रद्द करण्याची कठोर कारवाई अन्न व औषध प्रशासनाकडून केली जाईल, अशी माहिती या खात्याचे मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिली.

दूधभेसळ रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाकडून ठिकठिकाणी धाडी टाकण्यात येत आहेत. 15 जानेवारी रोजी घातलेल्या धाडीदरम्यान अप्रमाणित दूध साठे आढळले होते. या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.