मानेवरील काळे डाग घालवण्यासाठी करा हे साधे सोपे घरगुती उपाय! 

आपण सुंदर दिसावे म्हणून चेहरा, हात-पाय यांची काळजी घेतो. परंतु अनेकांची काळी पडलेली मान मात्र या सौंदर्यामध्ये मीठाचा खडा पडल्यासारखी असते. त्यामुळे काळी मान असल्यास आपण घरगुती उपायांचा वापर करू शकतो. त्यामुळे आपली काळी मान उजळ होण्यास नक्कीच मदत होईल. बरेच लोक मान काळी असते याकडे दुर्लक्ष करतात. साध्या सोप्या घरगुती वापराच्या गोष्टी आपण मानेला लावुन मानेचा काळेपणा घालवु शकतो.

आपल्या घरामध्ये हरभरा पीठ हे कायम असते. हरभरा पीठ हे त्वचेला उजळपणा येण्यासाठी सर्वात बेस्ट आहे. हरभरा पीठ, हळद, लिंबाचा रस आणि दही एकत्र करून जाड पेस्ट तयार करावी. ही पेस्ट किमान 15 ते 20 मिनिटे मानेवर राहू द्यावी. 20 मिनिटांनंतर कोमट पाण्याने मान पूर्णपणे धुवावी. असे आठवड्यातून किमान 2 ते 3 वेळा केल्यास आपल्या मानेवरील काळेपणा दूर होण्यास नक्की मदत होईल.

 

मानेवरील काळेपणा घालवण्यासाठी कच्चे दूध वापरणे केव्हाही हितकारक. एक कप कच्चे दूध घ्या, त्यामध्ये कापसाचा बोळा बुडवावा. हा बोळा आपल्या मानेवर लावावा. हा प्रयोग किमान एक महिना करावा, म्हणजे याचे खूप चांगले परीणाम आपल्याला दिसतील.

 

बेकिंग सोडा वापरुनही आपण मानेवरील काळे डाग घालवु शकतो. बेकिंग सोडा आपण साध्या पाण्यात मिसळून घ्यावा. ही पेस्ट गळ्यावर लावा आणि  15 मिनिटे तसेच ठेवावे. बेकिंग सोडा हा त्वचेतील हायपरपिग्मेन्टेशनची समस्या दूर करण्यात मदत करतो.

 

टोमॅटोला सुद्धा एक नैसर्गिक ब्लीच मानले जाते, जे गडद त्वचेला उजळ करण्यास मदत करते. टोमॅटोची फोड कापून त्याचा रस मानेवर लावावा. टोमॅटोमुळे काळी त्वचा उजळ होण्यास मदत होते. किमान 20 मिनीटे टोमॅटोचा रस मानेवर तसाच ठेवावा. त्यानंतर मान स्वच्छ धुवावी.

 

(कोणतेही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.)