आंतरराष्ट्रीय पातळीवरील वंध्यत्व निवारण तज्ञ, एंडोस्कोपिक सर्जन आणि स्त्राrरोग तज्ञ डॉ. सुनीता तांदुळवाडकर यांची फेडरेशन ऑफ ऑब्स्टेट्रिक अॅण्ड गायनेकोलॉजिकल सोसायटी ऑफ इंडियाच्या (फोग्सी ) अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. बीकेसीमधील जिओ वर्ल्ड कन्वेन्शन सेंटर येथे झालेल्या 67 व्या ऑल इंडिया काँग्रेस ऑफ ऑब्स्ट्रेटिक्स अॅण्ड गायनेकोलॉजीच्या कार्यक्रमात ही नियुक्ती करण्यात आली.
डॉ. तांदुळवाडकर या संस्थेच्या 63 व्या अध्यक्षा आहेत.
कार्यक्रमादरम्यान डॉ. सुनीता तांदुळवाडकर यांनी महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने राबवल्या जाणाऱया विविध उपक्रमांची माहिती दिली. त्या म्हणाल्या, स्त्रियांच्या आरोग्यातील गंभीर प्रश्नांचा सामना करण्यासाठी देशभरात आरोग्यसेवा प्रणाली, शिक्षणामध्ये आणि प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेत प्रगती घडवण्यासाठी ‘फोग्सी ’कडून उपक्रम राबवण्यात येत आहेत. आईचे आरोग्य आणि मृत्युदर, असंसर्गजन्य रोग (एनसीडी), सर्व्हायकल कॅन्सर, आरोग्यसेवेची उपलब्धता, प्रजनन आरोग्याविषयीची जागरूकता यासारख्या आव्हानांचा सामना केला जाणार आहे. त्याचबरोबर ‘स्वस्थ जन्म अभियान’, ‘नो युअर नंबर्स’, ‘दो टिके जिंदगी के’ यासारखे उपक्रम राबवले जात आहेत.