देशभरात महागाई दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे. वाढत्या महागाईमुळे दैनंदिन खर्चाचा तळमेळ घालणे गृहिणींना कठीण होत आहे. त्यातच आता दररोजच्या वापराच्या वस्तूंमध्ये म्हणजेच ( FMCG उत्पादनांमध्ये) 6 महिन्यात 20 टक्क्यांची वाढ झाली आहे. तर यत्या तिमाहीत म्हणजेच जानेवारी ते मार्चमध्ये या किंमतीत आणथी 30 टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच जगणे कठीण होत आहे.
खाद्यतेल, साबण, चहा, कॉफी, चॉकलेट आणि बिस्किटे यांसारख्या फास्ट मूव्हिंग कंझ्युमर गुड्स (FMCG) उत्पादनांच्या किमती 6 महिन्यांत 20 टक्क्यांनी वाढल्या आहेत. FMCG उत्पादनांना सर्वाधिक मागणी असते आणि सर्वसामान्यांकडून त्याचा दररोज वापर करण्यात येतो. जानेवारी-मार्चमध्ये त्यांच्या किमतीत आणखी 30 टक्के वाढ होण्याची शक्यता आहे.
पामतेल, नारळ, चहा, कोको आणि कॉफी यांसारख्या कच्च्या मालाच्या किंमती एप्रिल 2024 पासून 35-175 टक्के वाढल्या आहेत. त्यामुळे वाढती महागाईत जगायचे कसे, असा प्रश्न सर्वसामान्यांना पजत आहे. नुवामा इन्स्टिट्यूशनल इक्विटीजने एका अहवालात म्हटले आहे की, ‘काही FMCG कंपन्या जानेवारी-मार्चमध्ये पुन्हा किमती वाढवण्याची शक्यता आहे. गेल्या 3 महिन्यांत सामान्य घरगुती वस्तू 10 टक्क्यांनी महागल्या आहेत.
साबण, नाश्तासाठी आवश्यक गोष्टी आणि चहा यांसारख्या श्रेणीतील कंपन्यांना जमाखर्चाचा ताळमेळ घालण्यासाठी दरवाढ करणे गरजेचे असल्याचे सांगण्यात येते. पामतेल, चहा यांसारख्या वस्तूंच्या किमतीत दरवर्षी सुमारे 30 टक्के वाढ होत आहे. त्यांचे दर वाढत असले तरी उत्पादन खर्च वाढत असल्याने कंपन्याना दरवाढ करावी लागणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
एका मर्यादेपेक्षा किमतीत वाढ झाल्यास शहरी मागणीत घट होणार आहे. त्यामुळे या कंपन्यांसमोर मोठे आव्हान आहे. त्यामुळे मागणीत घट होण्याची शक्यता असल्याने किंमती वाढल्या तरी त्या मर्यादेत ठेवण्याचा कंपन्या विचार करत आहेत. त्यामुळे काही वस्तूंच्या किंमतीत येत्या तिमाहीत 5 टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे. महागाई वाढीचा सर्वाधिक फटका खाद्यतेलाला बसला आहे. खाद्यतेलाच्या किमती सर्वाधिक वाढल्या आहेत.
जपानी ब्रोकरेज फर्म नोमुराने दिलेल्या माहितीनुसार, सप्टेंबरपर्यंतच्या सहा महिन्यांत देशात सफोला ब्रँडच्या खाद्यतेलाच्या किमतीत सर्वाधिक 20 टक्क्यांनी वाढ झाली आहे. या काळात मॅरिकोने पॅराशूट कोकोनट ऑइलच्या किमतीत 10 टक्के वाढ झाली आहे. नोमुराचा अंदाज आहे की ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान कंपनीने उत्पादनांच्या किमती सरासरी 7.3 टक्क्यांनी वाढवल्या आहेत.
चहाच्या किंमतीतही वाढ होत आहे. चहाच्या घाऊक किंमती 33 टक्क्यांनी वाढल्या आहेत. टाटा कंपनीच्या चहाच्या किमतीमध्ये ऑक्टोबर ते मार्च 2025 दरम्यान 25-30 टक्के वाढ होणार आहे. यातील निम्म्याहून अधिक वाढ केवळ ऑक्टोबर-डिसेंबरमध्ये झाली आहे. गेल्या काही महिन्यात चहाच्या किमती सुमारे 33 टक्क्यांनी वाढल्या आहेत. ऑक्टोबर-डिसेंबरमध्ये नेस्लेने चॉकलेटसारख्या उत्पादनांच्या किमती 4.9 टक्क्यांनी वाढवल्या आहेत. हिंदुस्तान युनिलिव्हर आणि गोदरेज कंझ्युमरने 2024 मध्ये उत्पादनांच्या किमती सुमारे 10 टक्क्यांनी वाढवल्या आहेत. ऑक्टोबर-डिसेंबरमध्ये HUL ने सरासरी 2 टक्के आणि गोदरेज कंझ्युमरने 4 टक्क्यांनी किमती वाढवल्या आहेत.