
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर हिंदुस्थानने पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार रद्द केला आहे. यानंतर शनिवारी पाकिस्तानातील मुझफ्फराबाद येथील हत्तीन बाला भागात झेलम नदीत पाणी सोडले. झेलम नदीत पाणी सोडल्यामुळे मुझफ्फराबादमध्ये भयंकर पूर आला असून, यामुळे प्रशासनाने पाण्याची आणीबाणी जाहीर केली आहे.
उरीहून अनंतनाग जिल्ह्यातून चाकोठीकडे येणाऱ्या पाण्यामुळे झेलम नदीत अचानक भयानक पूर आला. यामुळे स्थानिक लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.