आसाममधील पुराचा दोन लाख नागरिकांना फटका

पूर आल्यामुळे आसाममधील जनजीवन विस्कळीत झाले असून पुराचा फटका तब्बल दोन लाख नागरिकांना बसला आहे. या पुरात आतापर्यंत 36 लोकांचा मृत्यू झाला आहे. मुसळधार पावसामुळे आसामला पुराचा विळखा बसला असून शुक्रवारी गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. अनेक जिह्यांतील लोक पूरस्थितीचा सामना करीत आहेत. कोपिली, बराक, कुशियारा सह अनेक नद्यांनी रौद्ररूप धारण केले आहे. आसाममधील 19 जिह्यांतील लोक पूरग्रस्त भागात जीव मुठीत घेऊन राहात आहेत. बजाली, बक्सा, बारपेटा, विश्वनाथ, कछार, दरांग, गोलपारा, हैलाकांडी, होजई, कामरूप, करीमगंज, कोकराझार, लखीमपुर, नागाव, नलबाडी, सोनितपूर, दक्षिण सालमारा, तामूलपूर, उदलगुरी या जिह्यांचा यात समावेश आहे.