
सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या शहरातील तापमानात प्रचंड उलथापालथ पाहायला मिळत आहे. एकाचवेळी दुष्काळ आणि पूरसदृश परिस्थितीचा सामना बऱ्याच देशांना करावा लागत आहे. जगातील वाढत्या तापमानामुळे जागतिक जलचक्रावर भीषण परिणाम होत असल्याचे, ‘वॉटरएड’ या संस्थेने केलेल्या अभ्यासातून समोर आले आहे.
जगातील दक्षिण आणि आग्नेय आशिया सर्वात जास्त ओल्या दुष्काळाचा सामना करत असून युरोप, मध्य पूर्व आणि उत्तर आफ्रिका या देशांत दुष्काळ पडत असून तेथील भाग कोरडे होत चालले आहेत. असे जगातील शंभरपेक्षा अधिक शहरांमधून काढलेल्या 42 वर्षांच्या हवामान अभ्यासाअंती संशोधकांना आढळून आले आहे, असे वॉटरएड संस्थेने म्हटले आहे.
जागतिक पटलावर तापमान बदल खूप आधीपासून घडत आहे. चीनचे शहर हांगझोउ आणि इंडोनेशियाचे जकार्ता दीर्घकाळापर्यंत पूर आणि दुष्काळाने ग्रस्त असलेल्या शहरांच्या यादीत अव्वल स्थानावर आहे, असे कार्डिफ विद्यापीठातील जल संशोधन संस्थेचे मायकेल सिंगर यांनी सांगितले. शांघायचे व्यावसायिक केंद्र टेक्सास शहर, डलास आणि इराकची राजधानी बगदाद या शहरांना तीव्र पूर आणि दुष्काळाचा धोका वाढला आहे. सर्वेक्षणापैकी 15 टक्के शहरांना एकाच वेळेला पूर आणि दुष्काळाचे धोके मोठय़ा प्रमाणात वाढत होते, असेही या अभ्यासात म्हटले आहे.