फ्लिपकार्टने नव्या वर्षातील पहिल्या सेलची घोषणा केली आहे. मोनूमेंटल सेल असे या सेलचे नाव असून हा सेल 13 जानेवारीला दुपारी 12 वाजता सुरू होणार आहे. या सेलमध्ये ग्राहकांना अनेक वस्तूंवर मोठा डिस्काऊंट मिळेल. या सेलमध्ये स्मार्टवॉच केवळ 899 रुपयांना खरेदी करता येणार आहे. टीव्ही 15,999 रुपयांना, तर वॉशिंग मशीन केवळ 6 हजार 790 रुपयांना खरेदी करता येऊ शकणार आहे.