Google चा पावरफुल फोन Pixel 8 सध्या Flipkart च्या सेलमध्ये सर्वात कमी किमतीत खरेदीसाठी उपलब्ध आहे. तुम्ही ऑफरसह फोनवर मोठ्या सवलतींचा लाभ घेऊ शकता. ही ऑफर फोनच्या 128GB व्हॅरिएंटवर उपलब्ध आहे. ई-कॉमर्स वेबसाइटवरील लिस्टिंगनुसार, या फोनवर 26,000 रुपयांची सूट मिळत आहे, यानंतर पिक्सेल 8 ची किंमत 49,999 रुपये होते. यातच जर तुम्ही HDFC बँकेचे क्रेडिट कार्ड वापरत असाल आणि EMI वर हा स्मार्टफोन खरेदी केला तर तुम्हाला 3,000 रुपयांची अतिरिक्त सूट मिळेल.
एक्सचेंजवर 13,365 रुपयांची सूट
या ऑफरसह फोनची किंमत 46,999 रुपयांपर्यंत खाली आली आहे. याशिवाय ग्राहकांना 35,000 रुपयांपर्यंतच्या एक्सचेंज ऑफर देखील दिला जात आहे. ज्यामुळे फोनची किंमत आणखी कमी होऊ शकते.
याचा अर्थ जर तुम्हाला एक्सचेंजच्या वेळी ही व्हॅल्यू मिळाली तर, फोनची किंमत जवळपास 33,000 रुपये राहते. जर तुमच्याकडे जुना स्मार्टफोन असेल ज्याचा तुम्हाला यापुढे उपयोग नसेल, तर तुम्ही तुमचा जुना फोन फॉरमॅट करा आणि फॅक्टरी रीसेट करा, तुम्हाला आवश्यक असलेला सर्व डेटा सेव करा आणि नंतर हा फोन एक्सचेंज करा. फोन खरेदी करताना काही अतिरिक्त पैसे वाचवण्याचा हा एक चांगला मार्ग आहे.
दरम्यान, ऑगस्ट 2024 मध्ये Google ने Pixel 8 सीरीज आणि Pixel 7a च्या किमतीत कपात करण्याची अधिकृत घोषणा केली होती. विशेषतः Pixel 8 च्या किंमतीत मोठी कपात करण्यात आली होती. याचा बेस व्हेरिएंट 128GB आहे, जो देशात 75,999 रुपयांना लॉन्च करण्यात आला होता, याची किंमत आता 71,999 रुपये करण्यात आली होती. फोनच्या 256GB मॉडेलची किंमत आधी 82,999 रुपये होती आणि जी आता 77,999 रुपये झाली आहे.