महाकुंभमुळे फ्लाईट आणि हॉटेलच्या भाड्यात वाढ

13 जानेवारीपासून महाकुंभमेळा सुरू झाला आहे. देश-विदेशातील भाविक या ठिकाणी पोहोचले आहेत. महाकुंभमुळे विमान भाडे आणि हॉटेलच्या दरात मोठी वाढ झाली आहे. देशातील काही मार्गांवरील विमान भाड्यात 70 टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. दिल्ली, हैदराबाद आणि कोलकाताहून प्रयागराज आणि लखनऊला जाणाऱ्या फ्लाइट्सच्या किमती 70 टक्क्यांनी वाढल्या असून हॉटेलच्या बुकिंगमध्ये 50 ते 60 टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. प्रयागराजमध्ये हॉटेल बुकिंग 10 पटीने वाढले आहे.

महाकुंभात टेंट टाऊन

भाविकांच्या सुविधेसाठी महाकुंभमेळय़ामध्ये 2 हजार टेंट्सचे एक छोटे शहर उभारण्यात आल़े हे टेंट्स साधारणपासून लक्झरी सुविधापर्यंत आहेत. याचे रोजचे भाडे साडेबारा हजार ते 50 हजार रुपयांपर्यंत आहे. काही खास कॅम्पचे लग्झरी टेंट्सचे भाडे प्रति दिन 1 लाख रुपये आहे.