हिंदुस्थान-पाकमध्ये पुन्हा एकदा झाली फ्लॅग मीटिंग, एलओसीवरील समस्या आणि सीमा व्यवस्थापन यावर चर्चा

सीमा व्यवस्थापनाशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी आज हिंदुस्थान आणि पाकिस्तानच्या सैन्याने जम्मू-कश्मीरच्या पूंछ जिह्यात नियंत्रण रेषेजवळ (एलओसी) फ्लॅग मीटिंग आयोजित केली. या महिन्यात दोन्ही देशांमधील ब्रिगेड कमांडरमध्ये दुसऱ्यांदा अशी बैठक पार पडली. चक्कन-दा-बाग क्रॉसिंग पॉइंट परिसरात उभय देशातील ब्रिगेडच्या नेतृत्वाची जबाबदारी असलेल्या अधिकाऱ्यांनी चर्चा केली. नियंत्रण रेषेवरील नियमित समस्यांवर चर्चा करण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली, असे लष्कराच्या प्रवक्त्याने सांगितले. हिंदुस्थान आणि पाकिस्तानमधील मिलिटरी ऑपरेशन्सचे महासंचालकांच्या समन्वयाने फ्लॅग बैठक आयोजित करण्यात आली होती.