पिंपरी-चिंचवडमधील भोसरी येथे पाण्याची टाकी कोसळून 5 कामगारांचा मृत्यू झाला. भोसरीतील सद्गुरू नगर येथे गुरुवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. याची माहिती मिळताच अग्निशमन दल, महापालिका प्रशासन आणि पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. ही दुर्घटने कशी घडली याचा तपास सुरू करण्यात आला आहे.
Maharashtra | Three people died and seven others injured after a portion of a water tank collapsed in Bhosari area of Pimpri Chinchwad this morning. All of them are labourers. Police present at spot: Senior Official Pimpri Chinchwad Police.
— ANI (@ANI) October 24, 2024
मिळालेल्या माहितीनुसार, पहाटेच्या सुमारास सद्गुरू नगरमधील पाण्याची टाकी अचानक कोसळली. येथेच लेबर कॅम्बमध्ये सर्व कामगार राहतात. या दुर्घटनेत 5 कामगारांचा जागीच मृत्यू झाला, तर काही कामगार जखमी झाले आहेत. घटनास्थळी रुग्णवाहिकाही पोहोचली असून जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, पाण्याची टाकी कोसळण्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. ही टाकी एका स्थानिक बिल्डरने बांधली होती. त्यामुळे टाकीच्या बांधकामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.