
मुंबईतील नागपाडा भागातील एका निर्माणाधीन इमारतीची पाण्याची टाकी साफ करायला उतरलेल्या पाच कामगारांचा गुदमरून मृत्यू झाला आहे. या पाचही कामगारांना जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. नागपाडा येथील बिस्मिल्लाह स्पेस बिल्डिंग जवळ रविवारी दुपारी दीडच्या सुमारास ही घटना घडली.