
पुणे हडपसर येथून तारकर्ली येथे पर्यटनासाठी आलेल्या पाच युवकांपैकी दोन युवकांचा समुद्राच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी सकाळी 11.20 वाजण्याच्या सुमारास तारकर्ली पर्यटन केंद्रानजीकच्या समुद्रात घडली. या दुर्घटनेतील एका युवकावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रोहित बाळासाहेब कोळी (21) व शुभम सुनील सोनवणे (22, दोन्ही रा. हडपसर, हवेली, पुणे) अशी मृतांची नावे आहेत. सकाळच्या सुमारास तारकर्ली पर्यटन विकास महामंडळाच्या नजीक असलेल्या समुद्रकिनारी हे युवक समुद्र स्नानासाठी पाण्यात उतरले होते.