माजी आमदार आणि अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्ये प्रकरणी पोलिसांनी आणखी पाच आरोपींना अटक केली आहे. त्यात नितीन सप्रे, रामफुल चंद कनौजिया, संभाजी पारधी, प्रदीप ठोंबरे आणि चेतन पारधी यांचा समावेश आहे. पोलिसांनी या आरोपींना वेगेवेगळ्या ठिकाणांहून अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नितीन सप्रे आणि राम कनौजिया या दोघांनी मुख्य आरोपींना बंदूक दिली होती. सप्टेंबर महिन्यात कर्जतमध्ये सप्रे आणि कनौजिया दोन दिवसांसाठी कर्जतमध्ये थांबले होते. मुख्य आरोपींनी या दोघांना काही पैसैही दिले होते. आता मुख्य आरोपींनी बंदूक चालवायचा सराव कुठे केला होता याचा तपास पोलीस करत आहे.
नितीन सप्रेला डोंबिवलीतून, रामफुल चंद कनौजियाला पनवेलमधून, संभाजी पारधी, प्रदीप ठोंबरे आणि चेनत पारधीला अंबरनाथहून अटक केली आगे. नितीन सप्रे हा मुख्य आरोपी शुभम लोणकरच्या संपर्कात होता. शिवकुमार आणि धर्मराज कुर्ल्यात राहण्यापूर्वी कर्जतमध्ये राहिले होते.
मुंबईच्या गुन्हे शाखेने पनवेल आणि कर्जतमध्ये छापे मारून पाच आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. सर्व आरोपी लॉरेन्स बिष्णोई गँगच्या संपर्कात होते. बाबा सिद्दीकी यांच्या खुनाप्रकरणी आतापर्यंत 9 जणांना अटक करण्यात आली आहे.