क्युएस आशिया रँकिंगमध्ये हिंदुस्थानच्या पाच आयआयटी

जगातील टॉप युनिर्व्हसिटीची क्युएस एशिया रँकिंग 2025 आज जारी करण्यात आली. क्युएस रँकिंगमध्ये देशातील 5 आयआयटी संस्था टॉप 100 मध्ये सामील झाल्या आहेत. आयआयटी दिल्लीने आयआयटी मुंबईला मागे टाकत देशात पहिले स्थान पटकावले.

क्युएस युनिर्व्हसिटी रँकिंग अहवालानुसार, देशातील 162 उच्च शैक्षणिक संस्थांना या रँकिंगमध्ये स्थान मिळाले. यामध्ये 21 संस्था पहिल्यांदाच सहभागी झाल्या. रँकिंगमध्ये पहिल्या क्रमांकावर चीनची पेकींग युनिर्व्हसिटी आहे, तर दुसऱ्या क्रमांकावर चीनच्या 135  युनिर्व्हसिटी आहेत. तर  जपानच्या 115 युनिर्व्हसिटी आहेत.

 आयआयटी दिल्ली, आयआयटी मुंबई, आयआयटी मद्रास, आयआयटी खरगपूर, आयआयएससी बंगळुरू, आयआयटी कानपूर,  दिल्ली युनिर्व्हसिटी या संस्थांनी यादीत स्थान मिळवले.

 – क्वाक्वेरेली सायमंड्स ( क्युएस ) दरवर्षी जगभरातील युनिर्व्हसिटीची रँकींग जारी करते. ऍकेडमिक प्रतिष्ठा, प्राध्यापक – विद्यार्थी गुणोत्तर, संशोधन,  पीएचडी फॅकल्टी, आदी मुद्यांच्या आधारे क्युएस रँकिंग दिले जाते.