मच्छिमार नेते अप्पा वांदरकर यांचे निधन

मच्छिमार नेते आणि मिऱ्या बंधाऱ्यासाठी लढा देणारे शांताराम उर्फ अप्पा वांदरकर यांचे आज सायंकाळी 4 वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यूसमयी ते 70 वर्षांचे होते.त्यांच्या पश्चात पत्नी व मुलगा असा परिवार आहे.

पांरपांरिक मच्छिमारी व्यवसायाबरोबरच अप्पा वांदरकर हे सामाजिक कार्यकर्ते होते.भारती शिपयार्ड कंपनीच्या आंदोलनात ते अग्रस्थानी होते.त्याचबरोबर मिऱ्या धूपप्रतिबंधक बंधाऱ्यासाठी अप्पा वांदरकर यांनी लढा उभा केला होता.पांरपरिक मच्छिमारांच्या हितासाठी त्यांनी आंदोलने पुकारली होती.

अप्पांच्या लढ्यामुळेच मिऱ्या बंधारा- विनायक राऊत

जेष्ठ समाजसेवक मच्छिमारांचे नेते, भाटीमिऱ्या गावाच्या संरक्षणासाठी नेहमी झटणार आप्पा वांदरकर यांचे निधन झाल्याची बातमी ऐकून खूप दु:ख झाले. मिऱ्या गावाचे समुद्राच्या भरतीपासून संरक्षणासाठी त्यांनी जो लढा उभारला त्याची दखल तत्कालीनमुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी घेवून मिऱ्या गावाच्या संरक्षण बंधाऱ्यासाठी व सुशोभिकरणासाठी 230 कोटी रुपये मंजूर करुन दिले. त्याचे पूर्ण श्रेय आप्पांच्या आंदोलनाला जाते अशी प्रतिक्रिया शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि माजी खासदार विनायक राऊत यांनी दिली.