IPL 2025 – सुपर ओव्हरचा थरार! स्टार्कने क्लास दाखवला, दिल्लीचा रुबाबदार विजय; राजस्थान पराभूत

आयपीएल 2025 मध्ये झालेल्या पहिल्या सुपर ओव्हरमध्ये राजस्थान रॉयल्सचा (RR) दिल्ली कॅपिटल्सने (DC) पराभव केला आहे. प्रथम फलंदाजी करताना दिल्लीने राजस्थानला 188 धावा करत 189 धावांचे आव्हान दिले होते. परंतु आव्हानाचा पाठलाग करताना शेवटच्या षटकात स्टार्कने केलेल्या अचूक माऱ्यामुळे राजस्थानची गाडी 188 धावांवर स्टॉप झाली आणि सामना टाय झाला. सुपर ओव्हरमध्ये राजस्थानने प्रथम फलंदाजी केली आणि ऑलआऊट होतं 11 धावा केल्या. सुपर ओव्हर टाकण्याची जबाबदारी यावेळी स्टार्कने अगदी चोख पार पाडली. रियान पराग आणि यशस्वी जयस्वाल यांना धावबाद करत सुपर ओव्हरचे षटक 5 चेंडूमध्येच समाप्त झाले. त्यानंतर 12 धावांच्या आव्हानाचा पाठलाग दिल्लीने षटकार मारत अगदी थाटात पार केला.