‘मराठबोली, पुणे’ या संस्थेने घेतलेल्या राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धेत सर्व विषयांना स्पर्श करणाऱ्या श्रेणीत मुंबईतील चार अंकांना प्रथम पुरस्कार मिळाला आहे. त्यात ‘सदामंगल पब्लिकेशन’च्या ‘अंतरीचे प्रतिबिंब’ या दिवाळी अंकाचा तसेच ‘शब्दवेल’, ‘सृजन’ आणि ‘पलाश’ या चार अंकांचा समावेश आहे. तर विशिष्ट विषयाला वाहिलेल्या गटात मुंबईतल्या ’तारांगण’ आणि ‘अर्थशक्ति’ तसंच पुण्यातील ‘किशोर’ या मुलांसाठीच्या तसंच पुण्यातल्याच ‘विनर्स’ या कृत्रिम बुद्धिमत्ता निर्मित अंकाला प्रथम पुरस्कार मिळाला आहे. 29 डिसेंबर रोजी मराठवाडा मित्रमंडळ कॉलेज, डेक्कन जिमखाना येथे पुरस्कार वितरण समारंभ होईल, अशी माहिती ‘मराठबोली’चे संस्थापक परमेश्वर उमरदंड आणि अध्यक्ष शिवाजी भापकर यांनी दिली.