देशात आढळला पहिला मंकीपॉक्सचा रुग्ण, संपर्कात आलेल्या लोकांचा शोध सुरू

काल देशात मंकीपॉक्सचा एक संदिग्ध रुग्ण आढळला होता. या रुग्णाच्या रक्ताचे नमुने तपासले असता ते पॉझटिव्ह निघाले आहेत. त्यामुळे हा हिंदुस्थानातला पहिल मंकीपॉक्सचा रुग्ण आहे.

8 सप्टेंबरला मंकीपॉक्सची लक्षणं आढळलेला एका तरुणाल सापडला होता. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार हा रुग्ण मंकीपॉक्स प्रभावित देशातून परतला होता. या रुग्णाला मंकीपॉक्सची लक्षणं दिसल्यानंतर त्याला तत्काळ आयसोलेट करण्यात आले होते. त्यानंतर त्याच्या रक्ताचे नमुने घेऊन तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. हे नमुने पॉझिटिव्ह आढळले आहेत.

या रुग्णाला मंकीपॉक्स झाल्याचे निष्पण्ण झाल्यानंतर आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली आहे. या रुग्णाच्या संपर्कात कोण कोण आलं होतं याचा शोध आरोग्य मंत्रालाय घेत आहे. तसेच याबाबत घाबरण्याचे काही कारण नाही असेही आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.