
येत्या 21 ते 24 एप्रिलदरम्यान प्रभादेवी येथील पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीमध्ये ‘चित्रपताका’ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘मराठी चित्रपटसृष्टीचे प्रतिनिधित्व करणारी एक झळाळती पताका म्हणजेच ‘चित्रपताका’ ही संकल्पना या महोत्सवामागे आहे.
महाराष्ट्र शासन सांस्पृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ आणि पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मराठी चित्रपट महोत्सवाच्या बोधचिन्हाचे अनावरण सांस्पृतिक कार्यमंत्री अॅड. आशीष शेलार यांच्या हस्ते करण्यात आले. मराठी सिनेमाची चित्रपताका घेऊन अटकेपार जाणारा मावळा या अर्थाने राज्याच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट महोत्सवाचे नाव ‘चित्रपताका’ असे ठेवले आहे, अशी माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड. आशीष शेलार यांनी आज दिली. चित्रपटांची निवड करण्यासाठी डॉ. संतोष पाठारे, सुकन्या कुलकर्णी, समीर आठल्ये आणि पुरुषोत्तम बेर्डे या तज्ञांची निवड समिती नेमण्यात आली होती.
n चार दिवसांच्या या चित्रपट महोत्सवात एपूण 41 दर्जेदार मराठी चित्रपट दाखवले जाणार आहेत. या चित्रपटांमध्ये पूर्ण लांबीचे सामाजिक, ग्रामीण, ऐतिहासिक, पर्यावरणविषयक, स्त्री जीवनाविषयक प्रश्न मांडणारे चित्रपट, बालचित्रपट, विनोदी चित्रपटांचा समावेश आहे.
n या महोत्सवात चित्रपट क्षेत्रातील विविध विषयांवर पाच परिसंवाद, दोन मुलाखती आणि दोन कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहेत. सिने पत्रकारांसाठी विशेष कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. तसेच मराठी चित्रपटांविषयीचे प्रदर्शनही या महोत्सवात असणार आहे.